Ad will apear here
Next
आयुर्वेदीक गर्भसंस्कार
निरोगी मातृत्वासाठी आणि निरोगी बाळासाठी गर्भसंस्कार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. विशेषतः आयुर्वेदामध्ये यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. याचीच ओळख डॉ. शारदा महांडुळे-निर्मळ यांनी या पुस्तकात करून दिली आहे.

विवाह ठरल्यापासून काय करावे, संततप्रतिबंधक उपाय, गर्भधारणेपूर्वीची काळजी, अडचणी अशी सुरुवातीची चर्चा केल्यावर पंचकर्म, गर्भाधान विधीची माहितीही त्या देतात. या सर्व काळात डॉक्टरांचा सल्ला आणि कुटुंबियांचा आधार कसा महत्त्वाचा असतो, हे सांगायलाही त्या विसरत नाहीत.

गर्भाची टप्याटप्याने वाढ, गर्भावस्थेतील मातेचा आहार, स्तोत्र व मंत्रोपचार, गर्भावतीचा दिनक्रम, व्यायाम आदींची माहितीही समजते. प्रसूतिगृह निवडताना काय करावे, सुतिकेचा आहार व विहार, बाळाची दिनचर्या यांबरोबरच रुग्णांच्या अनुभवांचाही पुस्तकात समावेश आहे.

प्रकाशक :
दुर्वांकुर प्रकाशन
पाने : २१९
किंमत : ३८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZWHBJ
Similar Posts
आयुर्वेदीय बालसंस्कार संस्कार म्हणजे सुधारणे. चांगल्या गोष्टी ग्रहण करणे. एखादे बीज रुजवितानाही त्याच्यावर अनेक संस्कार केले जातात. मग अपत्यरूपी बीजावर तर किती संस्कार करावे लागतील? अशा शब्दात डॉ शारदा निर्मळ-महाडुंळे यांनी आयुर्वेदीय बालसंस्कारांचे महत्त्व सांगितले आहे. या पुस्तकात अपुऱ्या दिवसांच्या बाळापासून ते नवजात बाळाची काळजी, बाळगुटी यांची माहिती आहे
हीलिंग : एक प्रकाशवाट स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचारपद्धती उपयुक्त ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’ या उपचारपद्धतीचे काम कसे
गुड बाय डायबेटीस + डाएट मंत्रा मधुमेह म्हणजेच डायबेटीस हा आजार अन्य व्याधींचे कारण बनू शकतो. त्यावर आयुष्यभर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. अशा मधुमेहासंदर्भात डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुड बाय डायबेटीस’मधून जागृती केली आहे.
आरोग्य तुमच्या हातात - अर्थात रोगानुसार योगा आपल्या सर्वांकडे एक गोष्ट समान असते ती म्हणजे शरीर. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्त्वाचा ठरतो. या गोष्टींकडे लक्ष वेधत प्रा. दिनेश भालके यांनी ‘आरोग्य तुमच्या हातात अर्थात रोगानुसार योगा’मधून योगाभ्यासाविषयी मार्गदर्शन केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language